मुंबई : अफगाणिस्तानचा जादुगार लेग स्पिनर राशिद खानने आयपीएलमध्ये चांगली छाप पाडली आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत त्याने जगभरात त्याच्या नावाचा डंका वाजवला आहे. 2017 साली राशिदने सनरायझर्स हैदराबादकडून डेब्यू केलं होतं. दरम्यान कालच्या सामन्यात डेब्यू केलेल्या टीमविरूद्ध खेळण्याची भावना राशिदने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 मध्ये, राशिद खान त्याच्या माजी फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमध्ये प्रथमच खेळला. राशिदने सामन्यानंतर बोलताना SRH विरुद्ध खेळताना कसं वाटलं हे सांगितलं.


राशिद खान म्हणाला, जेव्हा पहिल्यांदा मी सनरायझर्सविरूद्ध खेळण्यास उतरलो होतो त्यावेळी मला खूप विचित्र वाटलं होतं. मी माझ्या खेळावर फोकस करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र तरीही माझ्या डोक्यात विविध गोष्टी सुरूच होत्या. आता दुसऱ्यांदा सनरायझर्सविरूद्ध खेळायला उतरल्यानंतर डोक्यातील सगळे विचार निघून गेलेत.


कालचा सामन्यात सनरायझर्सविरूद्ध आयपीएलमध्ये उतरण्याची राशिदची ही दुसरी वेळ होती. यापूर्वीही गुजरात टायटन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता.


सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 पूर्वी त्यांचा प्रमुख गोलंदाज राशिद खानला रिलीज केलं होतं. त्यावेळी या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. 


हैदराबादने रिलीज केल्यानंतर, नवीन आयपीएल फ्रेंचायझी गुजरात टायटन्सने राशिद खानवर बोली लावली आणि 15 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.