मुंबई : 2018 मध्ये आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये अनेक सामने रोमहर्षक ठरले. सगळ्याच संघांनी एकमेकांना जोरदार टक्कर दिली. यंदाच्या सीजनमधली टॉप टीमच फायनलमध्ये पोहोचली. रविवारी चेन्नई आणि हैदराबाद फायनलमध्ये एकमेकांसमोर आले. पण चेन्नईने हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. या टूर्नामेंटमध्ये हैदराबादच्या टीमने शानदार कामगिरी केली. हैदराबादने अफगानिस्तानचा खेळाडू राशिद खानच्या कामगिरीमुळे अनेक सामने जिंकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादकडून खेळणाऱ्या राशिद खानने फायनलमध्ये देखील चांगली कामगिरी केली पण तो आपल्या टीमला विजय मिळवून नाही देऊ शकला. राशिद खानने 6.73 च्या ईकोनॉमीने आणि 21.80 च्या एव्हरेजने एकूण 21 विकेट घेतल्या. पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो दुसऱ्या स्थानावर राहिला. राशिद खान या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आकर्षणाचं केंद्र बनला. पण संपूर्ण सीजनमध्ये चांगली कामगिरी करुनही त्यांना कप जिंकता न आल्याने राशिद नाराज झाला.



राशिद खानने आपल्या फॅन्सचं दु:ख लक्षात घेत त्यांची माफी मागितली. राशिद खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत माफी मागितली. त्याने म्हटलं की, 'आय एम रियली रियली सॉरी टू फँस... फँससाठी मी खूप दु:खी आहे. यंदा आम्ही चॅम्पियन नाही बनू शकला. मला वाटतं की, आम्ही आतापर्यंतचा सर्वात चांगली आयपीएल पाहिली. रोमहर्षक सामने पाहायला मिळाले. मॅनेजमेंट आणि कोचिंगला धन्यवाद. खास करुन फॅन्सचं...पुढच्या वर्षीची मनापासून वाट पाहत आहे.'