दुबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना नाहीये. मात्र आजचा होणारा न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तानचा सामना भारतासाठी मात्र फार महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यावर भारताचा सेमीफायनलचा प्रवास अवलंबून आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाज अश्विन आणि अफगाणी गोलंदाज राशिद खान याला ऑफर दिली असल्याचं समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या मॅचपूर्वी आर अश्विन याने अफगाणिस्तानला मदतीची ऑफर दिली होती. आर अश्विनच्या म्हणण्याप्रमाणे, अफगाणिस्तान टीम खूप चांगला खेळ करतेय. तसंट मुजीब न्यूझीलंड विरुद्ध खेळणार असेल तर आम्ही त्यांना फिजियोचा सपोर्ट देण्यासाठी देखील तयार आहोत.' ही अशी मजेशीर ऑफर अश्विनकडून देण्यात आली होती.


तर अश्निनच्या या मजेशीर मदतीच्या पुढाकाराला राशिद खाननेही भन्नाट उत्तर दिलं आहे. 'भावा, टेन्शन घेऊ नकोस. आमच्या टीमचे फिजिओ प्रशांथ पंचाडा आहेत.' दरम्यान या दोघांचं हे बोलणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 



अफगाणिस्तानकडून संपूर्ण देशाला आशा


न्यूझीलंड जिंकल्यास उपांत्य फेरीचे दरवाजे भारतासाठी बंद होतील कारण न्यूझीलंडचे आठ गुण होतील आणि शेवटचा सामना जिंकूनही भारताला तितके गुण मिळवता येणार नाहीत. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास त्यांच्या माफक आशा कायम राहतील तर भारताच्या संधी मजबूत असतील, ज्यांना शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. न्यूझीलंड जिंकल्यास भारताचा नामिबियाविरुद्धचा शेवटचा साखळी सामना ही औपचारिकता राहील.