मुंबई : IPL च्या 14 व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची फार खराब कामगिरी पहायला मिळाली होती. ही टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. फ्रँचायझीने सीझनच्या मध्यात विल्यमसनकडे कर्णधारपद सोपवलं, पण तोही टीमचं नशीब बदलू शकला नाही. आता सनरायझर्सने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत. कारण हैदराबाद फ्रँचायझीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार केन विल्यमसनला रिटेन करायचं आहे.


राशिद खान ऑक्शनमध्ये दाखल होण्याची शक्यता


नंबर-1 आणि नंबर-2 रिटेंशनमधील सॅलरीमघ्ये 4 कोटी रुपयांचा फरक आहे. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद केन विल्यमसनच्या रूपात केवळ एकच खेळाडू कायम ठेवू शकतो, जो त्यांचा कर्णधार म्हणूनही देखील संघाची धुरा सांभाळण्यास सक्षम आहे.


रशीद लिलावात सामील होण्यास तयार असेल आणि अनेक फ्रँचायझी त्याच्या फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत रशीदला रिलीज केल्यानंतर सनरायझर्सला त्याला पुन्हा घेणं कठीण होईल.


IPL 2022 च्या रिटेन्शन नियमांनुसार, आधीच असलेले आठ संघ जास्तीत जास्त चार खेळाडू राखू शकतात. यासाठी आठ जुन्या संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत खेळाडू कायम ठेवण्याची यादी जाहीर करावी लागणार आहे. यानंतर लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ 1 ते 25 डिसेंबर दरम्यान प्रत्येकी तीन खेळाडू जोडू शकतात.