Ravi Bishnoi Catch Video : एक काळ होता मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांचा... पाईंटवर बॉल आला की घारीसारखी नजर ठेऊन बॉलवर झडप घालायची. तरणाताठ्या पोरांसाठी युवराज आणि कैफ म्हणजे इन्स्पिरेशन.. आता काळ बदललाय. क्रिकेट अधिक ताठर झालंय. आता सूर्यकुमार आणि विराटसारख्या खेळाडूवर सर्वांची नजर असले. कॅच पकडा आणि मॅच पकडा, असं समिकरण सध्या क्रिकेटचं झालंय. त्यामुळे क्रिकेटमध्ये फिल्डिंगवर भरपूर जोर दिला जातो. आता टीम इंडियाचे नवे छावे झिम्बॉब्वेविरुद्ध आपली कमाल दाखवतायेत. अशातच आता तिसऱ्या टी-ट्वेंटीमध्ये रवी बिश्नोईच्या (Ravi Bishnoi catch) कॅचने अनेकांना चकित केलंय.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टी-20 सामन्यात रवी बिश्नोई सुपरमॅन अवतारात दिसला. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेटकडे स्ट्राईक आली. त्यावेळी आवेश खानच्या हातात बॉल होता. आवेशच्या पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेटने बॅकवर्ड पॉइंटवर शॉट मारला. बॉल आरामात फोरच्या दिशेने जाईल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, पाईंटवर उभा ठाकला होता रवी बिश्नोई. बिश्नोईने हवेत उडी मारली अन् गोळीच्या स्पीडने बॉन्ड्रीकडे जात असलेला बॉल पकडला. 


बिश्वोईची फिल्डिंग पाहून अनेकजण चकित झाले. खुद्द ब्रायन बेनेटला देखील हसू आवरलं नाही. तर आवेश खान आणि इतर खेळाडूंनी बिश्नोईचं कौतूक केलं. बिश्नोईच्या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.


पाहा Video



टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.


झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.