मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली डकआऊटची हॅट्रिक करता करता वाचला आहे. सलग तिसऱ्यांदा डकआऊट होता होता थोडक्यात वाचला. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोहलीच्या फ्लॉप शो सुरूच आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. त्यामुळे चाहतेही खूप जास्त निराश आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटला गेल्या 100 सामन्यांमध्ये एकही शतक लगावता आलेलं नाही. विराटच्या या 100 सामन्यांमध्ये 17 कसोटी, 21 वनडे, 25 टी 20 आणि 37 आयपीएल मॅचचा समावेश आहे. मात्र विराटची शतकाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. 


विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. रवि शास्त्री यांनी कोहलीला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीला जर लाँट टर्मसाठी खेळायचं असेल तर त्याने ब्रेक घ्यावा असं रवि शास्त्रींनी म्हटलं आहे. 


याआधी विराट कोहलीला आराम मिळावा यासाठी रवि शास्त्री यांनी कोहलीची बाजू लावून धरली होती. आता त्यांनी कोहलीला आयपीएल सोडण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल सोडून कोहलीने आराम करावा असं सल्ला शास्त्रींनी दिला. 


टी 20 वर्ल्ड कपचा विचार करता रवि शास्त्रींचा सल्ला खरंच कोहली ऐकणार का आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रेक घेणार का हे पाहावं लागणार आहे. रवि शास्त्रींचा हा सल्ला फक्त कोहलीसाठीच नाही तर खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या अन्य खेळाडूंसाठीही आहे. 


हार्दिक पांड्या आधी दुखापतीमुळे आणि नंतर खराब फॉर्ममुळे चर्चेत होता. त्याने ब्रेक घेतला आणि आता आयपीएलमध्ये पुन्हा फुल्ल फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. त्यामुळे कोहली काय निर्णय घेणार तो रवि शास्त्रींचा सल्ला ऐकणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.