Ravi Shastri On india vs england: धमाकेदार अंदाजात सेमीफायनलचं तिकीट मिळाल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंडचा (INDvsENG) धुव्वा उडवण्यास सज्ज झाली आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल. टीम इंडियाची बॉलिंग आणि बॉटिंग पाहून टीम इंडियाच वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणार, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सगळं काही सुरळीत असताना आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh kartik) आणि ऋषभ पंत (Rishabh pant) यांच्या रूपाने दोन स्टार विकेटकीपर आहेत, त्यामुळं कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना इंग्लंडविरुद्ध संधी कोण देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र याआधीही रवी शास्त्री यांनी स्टार खेळाडूला संधी देण्याची मागणी केल्याच पहायला मिळतंय.


काय म्हणाले Ravi Shastri - 


दिनेश कार्तिक (DK) हा संघासाठी उत्तम खेळाडू आहे. पण जेव्हा इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांचा विचार केला जातो तेव्हा... त्यांचं आक्रमण पाहता, मला वाटतं की तुम्हाला एक मजबूत डावखुरा फलंदाज हवा आहे जो मॅचविनर म्हणून उदयास येईल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri On india vs england) म्हणाले आहेत.


आणखी वाचा- IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!


दरम्यान, सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी (IND vs ENG Semi Final) वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान (England batter Dawid Malan) जखमी आहे. त्यामुळे तो सेमीफायनलच्या प्लेइिंग 11 मध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.