मुंबई : बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेत विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकलं. यानंचर टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्माकडे ही जबाबदारी स्विकारण्यात आली. आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीने कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलंय. रवी शास्त्री म्हणाले की, "जेव्हा विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडलं होते. त्यानंतर रोहित शर्मा छोट्या कर्णधार होणार हे स्पष्ट होतं."


रोहित शर्मा टी-20 फॉर्मटचा कर्णधार असावा आणि विराट कोहली हा कसोटी कर्णधार असावा यात शंका नव्हती. मला विराट कोहलीमध्ये माझी प्रतिमा दिसते, असंही रवी शास्त्री यांनी सांगितलं.


दरम्यान कसोटी कर्णधार विराट कोहलीला दिलेल्या वागणूकीवर रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला आहे. 


यासंदर्भात रवी शास्त्री म्हणाले, विराट कोहलीने आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला. आता बाकी सर्व गोष्टी मिटवण्याची जबाबदारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची आहे. गांगुली यांनी आपली बाजू मांडणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीने संवाद साधल्यास परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती. 


विराट कोहली एक सर्वोत्तम कसोटी कर्णधार असल्याचं रवी शास्त्री मानतात. शास्त्री म्हणाले, "विराटमध्ये अनेकदा मी स्वतःला पाहतो. बऱ्याच अंशी मला विराटमध्ये माझाच चेहरा दिसतो. पॅशन, काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आणि आत्मविश्वास हे सगळं मला विराटमध्ये दिसतं."