AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, आव्हान पार करताना आर आश्विनने (Ravichandran Ashwin) कांगारूंना फिरकीवर नाचवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. नियमानुसार, ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला.  त्यानंतर आश्विनने फक्त 7 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या. आश्विनने डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन आणि लॉस इंग्लिस यांना तंबूत पाठवलं.


पाहा Video



दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या 10 ओव्हरमध्येच सामन्याचं चित्र दाखवलं. त्यानंतर शुभमन आणि श्रेयस यांनी शतक झळकावलं अन् सूर्याने अखेर फिनिशिंग टच दिला.


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (C), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (C), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.