R Ashwin: `मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...`, WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video
Ravichandran Ashwin, India vs West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे.
IND vs WI Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार स्पिनर आर आश्विन (Ravichandran Ashwin) याने कॅरेबियन खेळाडूंची कंबर मोडली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त 150 धावांवर आटोपला. या सामन्यात सुरूवातीपासून मजबूत पकड ठेवल्याने भारताचा विजय आता सोपा होताना दिसतोय. आश्विनने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या. आश्विनच्या या दमदार कामगिरीनंतर आता सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि मॅनेजमेंटवर टीका होताना दिसत आहे. अशातच आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे.
नेमकं काय म्हणाल आश्विन?
मला डब्ल्यूटीसी फायनलबद्दल खूप वाईट वाटलं, आम्ही दोनदा अंतिम फेरीत पोहोचलो आणि जिंकू शकलो नाही, याचं मला दु:ख आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्ध येथे नवीन सायकलची चांगली सुरुवात करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. या सामन्यातील कामगिरीने मी खूप खूश आहे, कारण संघानं नवीन हंगामाची शानदार सुरुवात केलीये, त्यामुळे आता चिंता नाही, असं आश्विन म्हणतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारख्या मोठ्या मॅचमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा क्रिकेटपटू म्हणून हे खूप कठीण असतं. जेव्हा आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मी खेळण्यासाठी पूर्णपणे तयार होतो. मात्र, संधी मिळाली नसल्याने मी नाराज झालो नाही. मी ड्रेसिंग रूममध्ये नाराज झालो असतो तर माझ्यात आणि युवा खेळाडूंमध्ये फरक काय राहिला असता? असंही आश्विन विचारतो.
पाहा Video
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात (West Indies vs India, 1st Test) फिरकीची जादू पहायला मिळाली. एलिक अथानाझे याने 47 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावासंख्या उभारता आली नाही. आश्विनने 5 तर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) देखील 3 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने एक एक विकेट नावावर केली.
पाहा दोन्ही संघ
भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन