मुंबई: आर अश्विनचं कुटुंब कोरोनातून सावरत असताना धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेवर आर अश्विननं देखील खास मेसेज लिहिला आहे. आर अश्विन शिकलेल्या शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. पीएसबीबी स्कूलच्या शिक्षकाला अटकण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएसबीबी शाळेतील एका शिक्षकावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे दु:खी झालेल्या अश्विननं सोशल मीडियावर एक मेसेज लिहिला आहे. 



अश्विनयाने ट्विटरवर लिहिले की, फक्त पीएसबीबीचा एक जुना विद्यार्थी म्हणूनच नव्हे तर दोन मुलींचे वडील म्हणून  ही घटना फार त्रासदायक आणि सुन्न करणारी आहे." लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली. भविष्यात आपल्या भोवतालच्या अशा घटना रोखण्यासाठी आपण कारवाई केली पाहिजे आणि यंत्रणा पूर्णपणे बदलण्याची गरज आहे.' असंही अश्विननं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


पीएसबीबी शाळेतील धक्कादायक प्रकार ऐकून खूप वेदना झाल्या. मी जेव्हा तिथे शिकण्यासाठी होतो तेव्हा अशा प्रकारच्या बातम्या किंवा घटना कधी घडल्या नाहीत किंवा समोर आल्या नाहीत. मात्र आता पीएसबीबीमध्ये घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे खूप दु:ख होत आहे. 


आर अश्विन 2 जून रोजी टीम इंडियाकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतातून निघणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्घ सीरिज खेळणार आहे.