भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान जगभरातून क्रिकेटर्स आणि क्रिकेट चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. पण लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे. त्याच्यासाठी क्रिकेट हे कोणत्याही एखाद्या खेळाडूपेक्षा मोठं आहे. पण 537 विकेट घेणाऱ्या आर अश्विनने आपल्याला क्रिकेटमधील काही मिथक बदलायचे नाहीत असं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल अथर्टन आणि नासीर हुसेन यांनी अश्विनसह व्हर्च्यूअल गप्पा मारल्या. आर अश्विन निवृत्ती घेतल्यानंतर सध्या चेन्नईत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चेदरम्यान, आर अश्विनने आपलं आत्मचरित्र "I Have The Streets: A Kutty Cricket Story" यामधील काही किस्से सांगितले. यावर्षी जुलै महिन्यात हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. यावेळी त्याने आपल्याबद्दल असणारं सर्वात मोठं मिथक सांगितलं. लोकांना वाटतं मी फार गंभीर आहे आणि विराट कोहलीप्रमाणे खेळाचा आनंद घेत नाही असं आर अश्विनने सांगितलं. पण असं काही नसून, आपण क्रिकेट खेळताना खेळाचा फार आनंद घेतो असं त्याने स्पष्ट केलं. 


"मी कोण आहे हे लोकांना माहिती व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण अनेकदा मी विकेट घेतो आणि विराट कोहली सगळीकडे आनंद साजरा करत असतो. तो उड्या मारत असतो आणि लोकांना यामुळे मी फार गंभीर असून विराटच सर्व मजा घेतो असं वाटतं. त्यामुळेच एकाने मला विचारलं होतं तू नेहमी गंभीर का असतो? यावर माझं पहिलं उत्तर असतं की मी अजिबात गंभीर नाही. पण जेव्हा चेंडू माझ्या हातात असतो आणि देशासाठी कसोटी सामना जिंकायचा असतो तेव्हा मनात ती प्रक्रिया सुरु असल्याने तो विचार सुरु असतो. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही मला पाच विकेट्स घेतल्यानंर आणि ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या किंवा हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसलेल्या माझ्या अर्धांगिणीला किस देताना दिसणार नाही. त्यामुळे मला हे सर्व पुस्तकातून सांगायचं होतं,” अश्विनने स्काय स्पोर्ट्सवर सांगितलं.


भारतात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना देवाप्रमाणे पूजलं जातं. पण क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने इतरांना बाजूला करणं कठीण आहे असं अश्विनला वाटतं. पण, अश्विनसाठी, तो नेहमीच त्याच्या स्वतःच्या कथेचा सर्वात मौल्यवान खेळाडू (Most Valuable Player) राहिला आहे. 


"अनेक लोक जेव्हा भारतीय क्रिकेटबद्दल बोलतात तेव्हा याबद्दल बोलतात. पण ही गोष्ट बदलायची आहे. ते विराट कोहली, रोहित शर्माबद्दल बोलतात. जेव्हा मी मोठा होत होतो तोवेहा सचिनबद्दल फार बोलत होते. मी इतर सुपरस्टार, सेलिब्रिटींबद्दलही बोललो. एक संदेश मी प्रत्येकाला देईन आणि मला सतत बदलायचे आहे ते म्हणजे हे गौरवशाली क्रिकेटपटू आहेत असे नाही तर बाहेरील लोक ज्यांना वाटते की प्रत्येकजण सपोर्ट कास्ट खेळतो ते अत्यंत चुकीचे आहेत कारण हा एक खेळ आहे. माझ्या आयुष्यातील एक MVP, माझ्या वडिलांसाठी किंवा माझ्या आईसाठी, मी MVP आहे. तो रोहित, विराट किंवा बाहेरचा कोणी नसतो, तसाच प्रत्येकाचा प्रवास अनोखा असतो. माझ्यासाठी मी नेहमीच MVP आहे आणि मी माझ्या क्रिकेटचा MVP आहे,” असंही तो पुढे म्हणाला.