मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सध्या भारतावर वाईट परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज कोरोनाची 4 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविली जात आहेत. एवढेच नव्हे तर दररोज देशातील हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. दरम्यान टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यानेही आपल्या कुटुंबावरील कोरोनाच्या संकटाविषयी उघडपणे भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2021 मध्येच सोडले होते. अश्विनने हा निर्णय फक्त आपल्या कुटुंबासाठी घेतला होता. त्याच्या यूट्यूब चॅनलवर अश्विन म्हणाला की, 'मी आयपीएल खेळत होतो, म्हणून माझ्या पत्नीने व माझ्या आई-वडिलांनी मला असे सांगितले नाही की घराची ही परिस्थिती आहे. माझ्या मुलांना 3-4 दिवस जास्त ताप आला. माझ्या पत्नीने मला सांगितले की आता काय करावे हे तिला माहित नाही कारण तिने औषधे दिली होती पण अद्याप ताप कमी झाला नव्हता.'


लसीमुळे वडिलांचा जीव वाचला


अश्विन म्हणाला की, 'माझे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्च झाले होते. माझे वडील सर्वप्रथम ठीक होते, परंतु नंतर त्याचा ऑक्सिजन 85 च्या खाली आला. श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डिस्चार्ज होऊनही, अनेक दिवसांपासून त्याच्या ऑक्सिजनच्या पातळीत कोणतीही सुधारणा झाली नाही. माझ्या वडिलांनी लसचे दोन्ही डोस घेतले. मी तुम्हास हमी देतो की लसमुळे माझ्या वडिलांचे प्राण वाचले.'



भारतात कोरोनाची दहशत
 
कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दररोज संसर्गाची चार लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. महत्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी वॅक्सीन घेतले पाहिजे. पण या दरम्यान गर्दी होणार नाही. याची काळजी देखील घेतली पाहिजे.