R Ashwin Statement Ahead Of 100th Test : येत्या 7 मार्चपासून इंग्लंड विरूद्ध इंडिया (IND vs ENG) कसोटी मालिकेतील शेवटचा सामना हा धर्मशाळा (Dharmashala test) येथे होणार आहे. इंग्लंड विरूद्ध इंडिया या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना हा धर्मशाळा येथे होणार असून दोन्ही संघांकरीता शेवटची कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या कसोटी मालिकेत काही खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते. अशातच आता अखेरच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र, आर आश्विन या सामन्यात नवा रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे. आश्विन धर्मशालाच्या मैदानावर 100 वा कसोटी सामना खेळेल. त्याआधी आता आश्विनने आपल्या भावना व्यक्त (Ravichandran Ashwin Statement) केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणतो आर आश्विन?


शेवटच्या कसोटी सामन्यासाठी मी आणि संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहोत, असं आर अश्विनने म्हटलं आहे. आर अश्विनचा हा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अश्विन म्हणतो की, मी लहान होतो तेव्हा मला एकदिवस का होईना इंडियाची जर्सी घालायची होती. मला माझं खेळणं महत्त्वाचं वाटतं. सामन्यादरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मी उपचाराकरीता संघातून बाहेर पडलो, तेव्हा माझ्या संपूर्ण टीमने माझ्या अनुपस्थितीत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो, अलं आर आश्विनने म्हटलं आहे.


इंडियाच्या टीमने आतापर्यंत यशस्वी खेळाडू दिले आहेत. खेळात आणि आयुष्यात ही आनंदाचे तसेच आव्हानाचं क्षण येतात. त्याला सामोरं जाणं जमायला हवं. जे प्रत्येक सामन्यात माझा संघ आव्हानाचा सामना करत असतो. आजपर्यंत मी जे काही चांगलं खेळू शकलो आहे त्या सगळ्याचं श्रेय माझ्या टीमला जातं. असं आश्विनने सांगितलं आहे. 


शेवटच्या कसोटी मालिकेत आर अश्विनची दमदाक कामगिरी पहायला मिळणार असून राजकोटच्या कसोटी मालिकेत त्याने त्याच्या टेस्ट करीयरमध्ये आतापर्यंत 500  विकेट्स घेतल्या. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अश्विन आता अनिल कुंबळेने तयार केलेला विक्रम मोडून काढणार का? हे पाहणं ही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. 



दरम्यान, अश्विनचा कसोटी सामन्यातील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, त्याने 99 कसोटी सामन्यात 35 वेळा पाच वेळा विकेट्स घेत अनिल कुंबळेची बरोबरी केली. त्यामुळे अश्विनची  धर्मशाळा येथील शेवटच्या सामन्यातील कामगिरी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पुढील सलग कसोटी सामने जिंकत प्रत्येक कसोटीत इंग्लंडचा पराभव केला.