`ज्या देशात खेळ धर्म असतो...`, मायकल वॉनच्या `अंडरअचीवर्स` टीकेवर आर आश्विनचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणतो...
Ravichandran Ashwin On Michael Vaughan : इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने टीम इंडियावर अंडरअचीवर्स नावाचा टॅग लावला होता. त्यावर आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) स्पिनर आर आश्विन याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Indian Cricket Team : भारत आणि साऊथ अफ्रिका (IND vs SA) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे साऊथ अफ्रिकेत मालिका जिंकण्याचं स्वप्न अपूरं राहिल्याचं पहायला मिळतंय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर रोहित अँड कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अनेकांनी भारतीय संघावर निशाणा साधला होता. अशातच इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने टीम इंडियावर अंडरअचीवर्स नावाचा टॅग लावला होता. त्यावर आता टीम इंडियाला स्पिनर आर आश्विन (Ravichandran Ashwin) याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाला Ravichandran Ashwin ?
मायकल वॉनने पहिल्या कसोटीनंतर भारत हा अंडरअचीवर्स म्हणजे कमी कामगिरी करणारा संघ असल्याचं वक्तव्य केलं होतं. होय, आम्ही अनेक वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या नाहीत. आम्ही स्वतःच्या खेळाला पॉवरहाऊस म्हणतो. पण कसोटी संघ सर्वोत्तम प्रवास करणाऱ्या संघांपैकी एक ठरला आहे. आम्ही अनेक उत्कृष्ट परिणाम पाहिले आहेत, त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं आर आश्विनने म्हटलं आहे.
टीम इंडिया खरोखर अंडरएचीव्हिंग संघ आहे का? असा सवाल अनेकजण विचारायला लागले. तेव्हा मला हसू आलं..! सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली असती, तर ते 65 धावांत सर्वबाद होण्याची शक्यता नव्हती का? भारत 20/3 वर उभा असतानाही, विराट आणि श्रेयस यांनी जशी भागेदारी केली, त्यामुळे टीमला सावरता आलं.
टेस्ट क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अंतर खुप जास्त आहे. भारतासारख्या देशात, जिथं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात क्रिकेटबद्दल बोललं जातं आणि जिथं लोक खेळाला धर्म मानतात, तिथं मला वाटतं की आपण जास्त टीका करतो. मला वाटतं की त्यातून पर्याय देखील खुले होतात. मला वाटतं की, हे आपल्याला आंधळं करतात, असं आर आश्विन म्हणतो.
आणखी वाचा - IND vs AFG टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूच्या खांद्यावर सोपवली कॅप्टन्सी!
दरम्यान, सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाने लाजीरवाणी कामगिरी केली खरी पण त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पराभवाचा वचपा काढला. दुसऱ्या कसोटीमध्ये अनेक विक्रम मोडत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी साऊथ अफ्रिकेला गुडघ्यावर आणलं. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्यांना साऊथ अफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलंय.