मुंबई : आयपीएलचा सिझन सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं कर्धणारपद सोडलं. यानंतर चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात नापास झाल्यामुळे रविंद्र जडेला संतापला आहे.


सांगितलं हरण्याचं कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामोरं जावं लागलं. जडेजाने पराभवाचं कारण देताना पिचवर दव असल्याचं म्हटलं आहे. 


जडेजा म्हणाला की, मला वाटतं पिचवर असलेलं दवाची महत्त्वाची भूमिका असते. पहिल्या डावातील सहा ओव्हरमध्ये खेळपट्टी ओलसर होती, मात्र दुसऱ्या डावात दव पडल्यामुळे फलंदाजी करणं सोपं झालं. याच कारणामुळे टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.


केकेआरविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा फ्लॉप झाला आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याला चांगला खेळ करता आला नाही. त्याने 28 चेंडूत केवळ 26 रन्स केले. त्याचबरोबर त्याला एकंही विकेट मिळवता आली नाही. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना होता. संपूर्ण सामन्यात त्याला एकच सिक्स मारता आला.


कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 रन्सचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मराठमोळा अंजिक्य रहाणे विजयाचा शिल्पकार ठरला आहे.