रवींद्र जडेजाने सलग दोन कॅच सोडले...भडकले चेन्नईचे फॅन्स
अंडर-19 वर्ल्डकपचा स्टार शुभमन गिलने करिअरमधील पहिल्या टी-२० अर्धशतकामुळे कोलकाताने आयपीएलमध्ये चेन्नईला सहा विकेटनी हरवले.
मुंबई : अंडर-19 वर्ल्डकपचा स्टार शुभमन गिलने करिअरमधील पहिल्या टी-२० अर्धशतकामुळे कोलकाताने आयपीएलमध्ये चेन्नईला सहा विकेटनी हरवले. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या गिलने ३६ चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी केली. यामुळे कोलकाताने १७.४ षटकांत १८० धावा करताना विजय मिळवला. शुभमनने कर्णधार दिनेश कार्तिकने पाचव्या विकेटसाठी सहा ओव्हरमध्ये ८३ धावांची भागीदारी केली. सुनील नारायणने ३२ धावा केल्या. जर जडेजाने या सामन्यात कॅच सोडले नसते तर सुनील केवळ ६ धावा करुन बाद झाला असता. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य दिले होते. पहिल्या ओव्हरमध्ये क्रिस लिनने दोन षटकार ठोकले. मात्र शेवटच्या बॉलवर तो बाद झाला.
दुसरी ओव्हर टाकण्यासाठी असिफ आला. त्याच्या एका बॉलवर सुनील नारायणने षटकार ठोकला. पुढच्याच बॉलवर त्याने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफवर उभ्या असलेल्या जडेजाने सोपा कॅच सोडला. ओव्हरच्या पुढच्याच आणि शेवटच्या चेंडूवर असिफने पुन्हा तसाच बॉल टाकला आणि नारायणनेही तसाच शॉट मारला. बॉल पुन्हा जडेजाकडे आला आणि पुन्हा कॅच सुटला. जडेजाने सलग दोन कॅच सुटल्याने चेन्नईचे फॅन्स चांगलेच भडकले.
यानंतर ट्विटरवरुन लोकांनी जडेजावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. युझर्स म्हणाले, जडेजालाच आता टीममधून ड्रॉप केले पाहिजे.