नवी दिल्ली : भारताचा माजी गोलंदाज झहीर खानची भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या समितीने मंगळवारी रवी शास्त्री यांना दोन वर्षांसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलीये तर झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेय.


झहीरची गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला, यामुळे भारतीय संघाला निश्चितच फायदा होईल. झहीर खानकडे खूप अनुभव आहे. वेगवान गोलंदाजांना त्यामुळे मोठा फायदा होईल. विशेषकरुन परदेशात ज्याची अधिक गरज असते.