मुंबई: मैदानात दोन संघात किंवा संघातील खेळाडूंची आपापसात छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होतच असतात. मात्र दोन खेळाडूंचं भांडण सोडवण्यासाठी टीम इंडियाचा आणि RCBचा कर्णधार विराट कोहलीला मध्यस्ती करावी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 मध्ये, भारत  कॅरेबियाई बेटावर सेल्कॉन चषक तिरंगी मालिका खेळत होता. ज्यात श्रीलंका आणि यजमान वेस्ट इंडिजचा समावेश होता. ही मालिका 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जडेजाच्या बळावर इंग्लंडला 5 धावांनी पराभूत करून भारताने मालिका जिंकली. 


दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला नव्हता, ज्यामुळे विराट कोहलीला प्रथमच भारतीय संघाचा कर्णधारपद मिळालं होतं. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानातर उतरत टीम इंडियाने विजय मिळवला. कोहलीने 83 बॉलमध्ये 102 धावा केल्या तर शिखर धवनने 69 धावा केल्या. भारताने या तिरंगी मालिकेच्या चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरूद्ध 7 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. 



सुनील नरेन फलंदाजी करत असताना नरेनने जडेजाच्या बॉलवर लांब शॉट खेळला. बाउंड्री लाइनआधी रैनाने हा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच पकडण्याच्या नादात फील्डिंग दरम्यान कॅच सुटला आणि रैना आणि जडेजामध्ये जोरदार भांडण सुरू झालं.


या भांडणामुळे काही सेकंद खेळ उशिरा सुरू झाला. मात्र हे भांडण सोडवण्यासाठी कर्णधार कोहली आणि इशांत शर्माला मध्यस्ती करावी लागली होती. टीम इंडियाने हा सामना ऑलआऊट करत जिंकला होता. मात्र रैना आणि जडेजाचं भांडण हा चर्चेचा विषय ठरलं.