वेटरची नोकरी करायचा हा खेळाडू, आता विराट कोहलीसोबत आयपीएल खेळणार
आयपीएलच्या लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.
बंगळुरू : आयपीएलच्या लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. तर काही खेळाडूंना जॅकपॉटही लागला. यातलाच एक खेळाडू म्हणजे कुलवंत खेजरोलिया. आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी कुलवंत रेस्टॉरंटमध्ये वेटरची नोकरी करत होता. मूळचा राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्याचा असणारा कुलवंत क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्यामुळे चिंताग्रस्त होता. याचवेळी त्यानं पैशांसाठी वेटरची नोकरी करायला सुरुवात केली.
वेटरची नोकरी करुन वैतागला कुलवंत
वेटरची नोकरी करून वैतागलेला कुलवंत दिल्लीत जाऊन एलबी शास्त्री क्लबशी जोडला गेला. गौतम गंभीर, नितीश राणा, उन्मुक्त चंद यांच्यासारख्या खेळाडूंना तयार करण्यात शास्त्री क्लबचं महत्त्वाचं योगदान आहे. संजय भारद्वाज यांच्या प्रशिक्षणाखाली खेजरोलियानं कठीण परीश्रम केले आणि तो डावखुरा फास्ट बॉलर बनला.
याआधी कुलवंत मुंबईच्या टीममध्ये
२०१७ साली झालेल्या लिलावामध्ये कुलवंतला मुंबई इंडियन्सनं १० लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये विकत घेतलं होतं. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कुलवंतला ८५ लाख रुपयांना विकत घेतलं.