मुंबई : IPL 2020 मध्ये गुरुवारी पार पडलेल्या सामन्यात कर्णधार के.एल. राहुल याच्या धमाकेदार शतकी खेळीच्या बळावर पंजाबच्या संघानं बंगळुरुच्या 'विराट'सेनेवर मात केली. तब्बल ९७ धावांनी बंगळुरूच्या संघावर विजय मिळवत पंजाबनं यंदाच्या ड्रीम 11 आयपीएलमध्ये पहिली विजयी पताका रोवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

virat kohli विराट कोहलीनं नाणेफेक जिंकत राहुलच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. बंगळुरूनं सुरुवातीलाच दिलेलं हे आवाहन स्वीकारत पंजाबचा संघ मैदानात उतरला आणि त्यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. 


एकट्या के.एल. राहुल यानं ६९ चेंडूंमध्ये त्यानं तब्बल १३२ धावांचा डोंगर रचला. यादरम्यान, राहुलला पुन्हा पवेलियनमध्ये पाठवण्याची संधीही बंगळुरुच्या संघापुढं आली होती. पण, विराटनं के.एलला झेलबाद करण्याची संधी दोन्ही वेळेस गमावली. काही कारणास्तव त्याला हे झेल टीपता आले नाहीत आणि पुढे सामन्याचं चित्रच बदललं. 


नवदीप सैनी आणि डेल स्टेन यांच्या गोलंदाजीवर राहुलचा झेल टीपण्याची चालून आलेली संधी विराटनं गमावल्यामुळं क्रीडारसिकांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली. या नाराजीनं सोशल मीडियावर ट्रोलिंगचं रुपही घेतलं. 






 


विराटनं गमावलेले झेल आणि त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलं असता त्याचं प्रभावी कामगिरी न करता परतणं यावर काहीशी टीका करणारे आणि विनोदी फटकेबाजी करणारे असंख्य मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. बॉलिवूड चित्रपटांपासून ते प्रासंगिक विनोदांपर्यंतची फोडणी या मीम्सना दिल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे पंजाबच्यासंघातनं हा सामना खिशात टाकला असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र बंगळुरूची 'विराट'सेना आणि खुद्द विराटही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले होते.