RCB चा पहिला आयपीएल सामना कधी आणि कुणासोबत? `विराट` खेळीकडे सर्वांचे लक्ष
RCB IPL Schedule 2024 in Marathi: IPL चे 2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडता संघाचा सामना कधी आणि कुठे होणार?
RCB IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL चे 2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) पहिला सामना महेंद्र सिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासह होणार आहे. विशेष म्हणेज आयपीएलच्या 17 व्या पर्वातील हा पहिलाच सामना असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स संघ, कोलकाता नाइट राइडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज असे एकूण दहा संघ IPL ची ट्रॉफी मिळवण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत. क्रिकेटप्रेमी आपल्या आवडीनुसार ज्या त्या संघांना सपोर्ट करत असतात. यामुळे आपल्या आवडत्या संघाची मॅच कधी आहे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. RCB संघाला सपोर्ट करणाऱ्यांसाठी यंदा सिजन खास असणार आहे. कारण, RCB संघाच्या मॅचनेच IPL ची सुरुवात होणार आहे.
आरसीबी आयपीएल वेळापत्रक 2024 - जाणून घेवूया RCB चे सामने कधी आणि कोणासोबत होणार आहेत?
RCB चा पहिला सामना CSK होणार आहे. 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये सायंकाळी 6:30 वाजता हा सामना होणार आहे. RCB चा दुसरा सामना PBKS सोबत 25 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता बेंगळुरु येथे होणार आहे. तिसरा सामना 25 मार्च रोजी KKR संघासोबत होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता बेंगळुरु येथे हा सामना होणार आहे. चौथा सामना देखील बेंगळुरुमध्येच होणार आहे. वेळ देखील सायंकाळी 6.30 हीच असणार आहे. 2 एप्रिल रोजी होणाऱ्या या सामन्यात RCB संघाची लढत LSG संघासोबत होणार आहे. 2 एप्रिल रोजी जयपुर येथे सायंकाळी 6.30 RCB चा पाचवा सामना हा RR संघाबरोबर होणार आहे.
विराट कोहली हा RCB संघाचा कॅप्टन आहे.फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विशाक कुमार विजा. , आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार आणि कॅमेरून ग्रीन हे RC चे रिटेन खेळाडू आहेत. तर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान यांना यंदाच्यालिलावात विकत घेण्यात आले. यंदा IPL चे सामने दोन टप्प्यात खेळवले जाणार आहेत. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचा पहिला टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.