मुंबई : बंगळुरू विरुद्ध सामन्यात दिल्ली टीमचा 16 धावांनी पराभव झाला. हा पराभव 5 खेळाडूंमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीचा या हंगामातील तिसरा पराभव आहे. याचा फटका दिल्लीला प्ले ऑफसाठी बसू शकतो. प्ले ऑफची वाट खडतर होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेइंग इलेव्हनमधील 5 खेळाडू ऋषभ पंतसाठी डोकेदुखी ठरले आहेत. ह्या खेळाडूंच्या खराब फॉर्मचा फटका सतत्याने दिल्ली टीमवर होत असल्याचं दिसत आहे. हे 5 खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया. 


मुस्तफिजूर रहमान - बंगळुरू विरुद्ध सामन्यात तो सर्वात जास्त फ्लॉप ठरला. 4 ओव्हरमध्ये 48 धावा देऊन एकही विकेट घेऊ शकला नाही. 


कुलदीप यादव - आता कुठे चांगल्या फॉर्ममध्ये परतेल अशी आशा असताना कुलदीपने हिरमोड केला. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा तो अपयशीच ठरला. त्याने 46 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली. 


पृथ्वी शॉ- धडाकेबाज फलंदाज म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिलं जातं. मात्र यंदाच्या हंगामात त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघताना दिसत नाहीत. बंगळुरू विरुद्ध सामन्यात त्याने 13 बॉलमध्ये 16 धावा केल्या. 


मिचेल मार्श - या खेळाडूकडून दिल्लीला खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षाच राहिल्या प्रत्यक्षात 24 बॉलवर 14 धावा काढण्यात मार्शला यश आलं.


रोवमॅन पॉवेल- बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात सर्वात फ्लॉप खेळाडू ठरला. जोश हेजलवुडच्या बॉलवर तो आऊट झाला. 2.80 कोटी रुपये देऊन दिल्लीने त्याला घेतलं मात्र पैसे पाण्यात घालवण्याची कामं हे पाच खेळाडू आपल्या वाईट फॉर्ममुळे करत आहेत.