RCB vs LSG : लखनऊ- बंगळुरू कोण जिंकणार आजचा सामना? पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
RCB vs LSG Dream 11 Prediction: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आमने-सामने येणार आहेत. बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील.
RCB vs LSG Dream 11 Prediction, IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्सचा सामना करेल. बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील. या हंगामात लखनौ संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले असून आरसीबीने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. मात्र लखनऊ आणि बंगळुरू यांच्यातील आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामने विजयी झाले आहेत. तर चेन्नईविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी आरसीबीने एका सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आज आरसीबीचा विजयी होणार का?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपल्या घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर परतण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. स्टार्सने जडलेल्या संघाची फलंदाजी केकेआरविरुद्ध फारशी अपयशी ठरली होती. केकेआरविरुद्ध कोहली, डुप्लेसिस आणि मॅक्सवेल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले, तर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनाही फलंदाजीत काही विशेष दाखवता आले नाही. केवळ फलंदाजीच नाही तर बंगळुरूच्या गोलंदाजांनीही गेल्या सामन्यातील कामगिरीने निराशजणक होती. रीस टोपलीच्या जागी आलेल्या वेन पारनेलला आरसीबी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
गेल्या सामन्यात लखनऊचा पिक्चर सुपरहिट
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्ससाठी, काइल मेयर्सने आतापर्यंत चांगल्या खेळी खेळला आहे. हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात कर्णधार राहुलही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. कृणाल पांड्याने बॉल आणि बॅट दोन्हीत कहर केला. त्याचवेळी अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राही हैदराबादच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या सापळ्यात बुचकळ्यात टाकण्यात यशस्वी ठरला. तर काइल मेयर्सने लखनौसाठी आतापर्यंत या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. हैदराबादविरुद्ध कर्णधार राहुलही चांगलाच दिसला आणि त्याने 35 धावांची खेळी केली. त्याचवेळी कृणाल पांड्याने 23 चेंडूत 34 धावांची धडाकेबाज खेळी केली. RCB विरुद्ध क्विंटन डिकॉक लखनौ संघाकडून खेळताना दिसू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेईंग 11: विराट कोहली, फाफ डुप्लेसी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अनुज रावत, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, आकाशदीप, मोहम्मद सिराज.
लखनऊ सुपर जायंट्स पॉसिबल प्लेइंग 11: काइल मेयर्स, केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई.