ऑलराउंडर मार्कस स्टोइनिस OUT होताच राग अनावर, बॉलरला शिवीगाळ? पाहा व्हिडीओ
आऊट झाल्याचं दु:ख आणि संताप... मैदानात तोंडावर हात ठेवून केलं असं काही की पाहणारे हैराण.... व्हिडीओ व्हायरल
मुंबई : लखनऊ टीमला बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी खेळवण्यात आलेला हा सामना गमवल्याचं दु;ख लखनऊ टीमला आहे. या रोमांचक सामन्या दरम्यान मार्कस स्टोइनिसचं वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं.
19 व्या ओव्हरमध्ये जोश हेजलवूडने मार्कसला क्लीन बोल्ड केलं. मार्कस या बॉलवर स्लॉग स्वीप खेळण्यासाठी तयार होता मात्र तो आऊट झाला. आऊट झाल्यानंतर तो खूप जास्त संतापला. त्याने शिवीगाळही केल्याची चर्चा आहे.
मार्कस बॅट आपटण्याच्या तयारीत होता मात्र त्याने स्वत:ला रोखलं. रागाच्या भरात तो तोंडातल्या तोंडात बोलत मैदानातून बाहेर गेला. यावेळी काय बोलतोय ते समजू नये म्हणून त्याने तोंडावर हात ठेवल्याचं पाहायला मिळालं.
मार्कस अर्वाच्च भाषा वापरत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत असून मार्कसला बॅन करण्याची मागणी
मार्कस नेमकं काय बोलत होता ते कळू शकलं नाही मात्र त्याच्या या कृतीवरून त्याला बॅन करण्य़ाची मागणी होत आहे. त्याला माहीत होतं आपली विकेट जाणं हे आपल्या टीमसाठी खूप धोक्याचं आहे. त्यामुळे संतापलेल्या मार्कचा राग अनावर झाला.
बंगळुरू टीमने 18 धावांनी लखनऊवर विजय मिळवला. 8 विकेट्स गमावून लखनऊ टीम 163 धावाच करू शकली. कॅप्टन के एल राहुलने याबाबत काहीशी नाराजीही व्यक्त केली आहे.