मुंबई :  'रनमशीन' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या बॅड पॅच सुरुय. विराट आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सातत्याने अपयश ठरतोय. विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आधीच वारंवार अपयशी ठरत असलेला विराट 13 मे ला पंजाब किंग्स विरुद्ध (RCB vs PBKS) झालेल्या सामन्यात दुर्देवीरित्या बाद झाला. यानंतर विराटने आकाशाकडे पाहत "माझ्यासोबत नक्की काय चाललंय" अशा प्रकारचे हावभाव केले. विराटची ही भावमूद्रा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. (rcb vs pbks ipl 2022 virat kohli sad reaction after his dismissed against punjab kings on kagiso rabada bowling)


नक्की काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅटिंगसाठी आलेल्या आरसीबीची अपेक्षित सुरुवात झाली. विराट आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी 33 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र यानंतर सामन्यातील चौथी ओव्हर टाकायला आलेल्या कगिसो रबाडाने ही जोडी फोडली. 


रबाडाने टाकलेल्या या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर विराटने 2 रन्स घेतल्या. रबाडाने दुसरा बॉल विराटच्या लेग साईडच्या बाहेर टाकला. 


विराट हा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. यात विराट फसला. विराटच्या ग्लव्हजला बॉल लागून तो राहुल चहरच्या दिशेने गेला. चहरने कोणतीही चूक न करता अचूक कॅच घेतला. विराटने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये 20 धावा केल्या. 


दुर्देवीरित्या बाद झाल्याने विराट निराश आणि हतबल झालेला दिसून आला. ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना विराटने आकाशात पाहिलं. यावेळेस विराट रागारागात काहीतरी पुटपटताना दिसला. तसेच आकाशाकडे दोन्ही हात उंचावून पुटपुटला. विराटचा हा व्हीडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.