धक्कादायक! विराट कोहलीला अहमदाबादमध्ये मिळाली धमकी, 4 संशयितांना अटक, RCB चा सराव रद्द
Virat Kohli Security Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.
Virat Kohli Security Threat RCB vs RR IPL 2024 : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना (IPL 2024 Eliminator) आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात होणार आहे. अशातच आता आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीला धमकी (Virat Kohli Threat) मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गुजरात पोलिसांनी 4 संशयित आरोपींना सोमवारी रात्री गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) अहमदाबादच्या विमानतळावरून अटक केलीये. त्यामुळे आता आजच्या सामन्यावर सावट निर्माण झालंय. आरसीबीने एलिमिनेटर सामन्यासाठी सराव न करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीला धमकी मिळाल्यानंतर आता आरसीबीचा संघ मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जातोय. आरसीबी संघाने सराव सत्रच नाही तर पत्रकार परिषद देखील रद्द केली आहे. त्यामुळे आता विराटच्या जीवाला धोका तर नाही ना? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. आरसीबीने अजूनही यावर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही. मात्र, पोलिसांनी यावर माहिती दिलीये.
पोलिसांनी काय म्हटलंय?
विराट कोहलीला अहमदाबादला पोहोचल्यानंतर काही संशयितांना अटक झाल्याची माहिती मिळाली आहे. विराटची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरसीबीला धोका पत्करायचा नव्हता त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आजचं सराव सत्र होणार नाही. राजस्थान रॉयल्सलाही याबाबत माहिती देण्यात आली होती, परंतु त्यांना सराव सुरू करण्यात कोणतीही अडचण आली नाही, असं पोलिस अधिकारी विजय सिंह यांनी सांगितलंय.
उन्हामुळे सामना रद्द?
तापमान 45 डिग्री असल्याने आरसीबीने सामन्यापूर्वी कोणताही सराव केला नाही. इनडोअर सरावासाठीही पर्याय देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं, मात्र उष्णतेमुळे सराव करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितलंय.
प्लेऑफची केवळ 1 टक्के संधी असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धमाकेदार कामगिरी केली अन् प्लेऑफमध्ये धडक मारून दाखवली. आरसीबीच्या कामगिरीमुळे आता फॅन्सच्या इच्छाशक्तीला बळ मिळालंय. अशातच आता आरसीबीला चाहत्यांचा हिरमोड करायचा नसेल तर उद्याचा सामना जिंकावा लागेल. आरसीबीसाठी विराट कोहली हुकमी एक्का राहिल.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (WK), महिपाल लोमर.
राजस्थानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल.