मुंबई : अंडर-19 वर्ल्डकप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद यशस्वी युवा क्रिकेटर झाल्यानंचर मिळणाऱ्या मान-सन्मानाशी परचित आहे. त्याने पृथ्वी शॉ आणि टीमला देखील एक संदेश दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदने म्हटलं आहे की, वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता खरी परीक्षा सुरु होणार आहे. मला माहित आहे की अंडर-19 वर्ल्डकपनंतर काय होतं. पण प्रत्येक अंडर-19 क्रिकेटरची कथा ही विराट कोहली, शिखर धवन यांच्यासारखी नसते. ज्यांनी अंडर-19 वर्ल्डकपनंतर 9 वर्षांनी टेस्टमध्ये पदार्पण केलं.


2012 मध्ये चंदने फायनलमध्ये शतक ठोकत भारतीय युवा टीमला विजेता बनवलं होतं. यानंतर चंद देशात गाजला होता. त्याने भारत ए संघाचं कर्णधारपद देखील निभावलं. इयान चॅपल सारख्या खेळाडूने त्याला सिनिअर टीममध्ये जागा देण्याची मागणी देखील केली होती. या 24 वर्षीय खेळाडूने म्हटलं की, समजू शकतो की, यावेळी पृथ्वी शॉ, शुभम गिल आणि कमलेश नागरकोटी कोणत्या परिस्थितीतून जात आहेत. कारण तो पण या परिस्थितीतून गेला आहे.


चंदने फायनलच्या एक दिवस आधी म्हटलं होतं की,'शनिवारनंतर ते विश्व पुरुष क्रिकेट जगतात प्रवेश करतील. त्यांच्या जीवनतल्या सुंदर क्षणांचा अंत होईल आणि नवे आव्हान पुढे येतील. पृथ्वीची टीम या खिताबाची प्रबळ दावेदार आहे. त्यांना सगळं काही विसरुन तणावापासून दूर राहून खेळावं लागेल.'