India vs England : टीम इंडियाच्या रेणूका ठाकूरने रचला इतिहास, 13 बॉलमध्ये घेतले 5 विकेट
Renuka singh Thakur created history, India vs England : रेणुकाने (Renuka Thakur)एकट्याने अर्ध्या संघाचा सामना केला. या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हरपैकी 13 चेंडूत एकही धाव दिली नाही, यावरूनच रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीचा अंदाज येतो. रेणुकाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 4 धावांपेक्षा कमी होता, जी टी-20 क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
Renuka singh Thakur created history, India vs England : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध (India vs England) सामना खेळत आहेत. या सामन्याता टीम इंडियाची स्टार गोलंदाज रेणूका ठाकूरने (Renuka Thakur) 5 विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करून तिने टी20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. या तिच्या ऐतिहासिक कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
अर्धा संघ तंबूत धाडला
सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात रेणुका ठाकूरने (Renuka Thakur) पहिल्याच ओव्हरपासून विकेट घेण्यास सुरूवात केली होती. रेणुकाने पहिल्याच ओव्हरमध्ये व्याटची विकेट घेतली. व्याट पहिल्याच चेंडूवर बाद झाली. यानंतर अॅलिस कॅप्सीला रेणुकाने (Renuka Thakur) अप्रतिम चेंडूवर बोल्ड केले.डंकलेच्या बाबतीतही असेच घडले, तिने 10 धावांवर तिची विकेट गमावली. शेवटच्या ओव्हरमध्ये तर तिने आणखीनच कहर केला होता.रेणुकाने शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या दोन विकेट्स पूर्ण केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये या वेगवान गोलंदाजाने धोकादायक फलंदाजी करणाऱ्या एमी जोन्सला 40 धावांत तंबूत आणले, तसेच कॅथरीन शिव्हर ब्रंटलाही बाद केले. यासह रेणुकाच्या (Renuka Thakur) पाच विकेट्स पूर्ण झाल्या.
रेणुकाने (Renuka Thakur)एकट्याने अर्ध्या संघाचा सामना केला. या वेगवान गोलंदाजाने आपल्या 4 ओव्हरपैकी 13 चेंडूत एकही धाव दिली नाही, यावरूनच रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीचा अंदाज येतो. रेणुकाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 4 धावांपेक्षा कमी होता, जी टी-20 क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
पहिली गोलंदाज ठरली
या उत्कृष्ट कामगिरीनंतर रेणुका ठाकूर (Renuka Thakur) ही भारताची पहिली मध्यमगती गोलंदाज ठरली आहे, जिने T20 विश्वचषकाच्या सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचवेळी, 14 वर्षांनंतर भारतीय गोलंदाजाने टी-20 विश्वचषकात पाच विकेट्स घेतल्या आहेत.2009 मध्ये प्रियंका रॉयनेही असाच पराक्रम केला होता. या T20 वर्ल्ड कपबद्दल बोलायच झालं तर रेणुका ठाकूर (Renuka Thakur) या वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट घेणारी दुसरी गोलंदाज आहे. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 12 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान रेणुकाने (Renuka Thakur) इंग्लंडविरुद्ध 4 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा देत 5 विकेट घेतल्या.रेणुकाच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडचा मजबूत संघ आणि विश्वचषक जिंकण्याचा मोठा दावेदार 20 षटकांत केवळ 151 धावाच करू शकला. आता टीम इंडिया या धावांचे आव्हान पुर्ण करून विजयाची हॅट्रीक साधते का, हे पाहावे लागणार आहे.