India vs South Africa T20 World Cup Final : यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या फायनल सामन्यात (T20 World Cup 2024) भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. बार्बाडोसच्या मैदानावर टीम इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका संघात फायनल (IND vs SA Final) सामना खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य राहिलेत, त्यामुळे आता कोणता संघ बाजी मारणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग (Ricky Ponting Prediction) याने टीम इंडियाला सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Ricky Ponting? 


साऊथ अफ्रिकाकडे नक्कीच भारताविरुद्ध मुकाबला करण्याची ताकद आहे. त्यांनी सिद्ध देखील केलंय की ते चांगली कामगिरी करतील. काही संघ असा विचार करतात की, ही फक्त एक मॅच आहे आणि ते स्वत:ला सांगत नाही की माझ्यासाठी ही मोठी संधी आहे, त्यामुळे असा विचार चुकीचा आहे, असं रिकी पॉटिंगने म्हटलं आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम काम करावं लागणार आहे. प्रत्येक खेळाडूला आपल्या जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं लागेल, असंही पॉटिंग म्हणाला आहे.


टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.