Sport News : आशिया चषकामध्ये भारताने पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकला. मात्र टीम इंडियाने घेतलेल्या एका निर्णयाने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये संघामध्ये यष्टीरक्षक म्हणून संघामध्ये ऋषभ पंतला स्थान देण्यात न आल्याने पॉंटिंगने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतला संघामधून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचंं मला आश्चर्य वाटलं. मला पंतला टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहायचं आहे कारण तो आक्रमक खेळाडू असून मला त्याचं कौशल्य माहित आहे. पंतला भारतासाठी आणि दिल्ली कॅपिटल्ससाठीही चांगलं करण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पॉंटिंग म्हणाला. 


भारतीय निवड समितीसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यातील निवड करणं हे कठीण जात असावं, असंही पॉंटिंगने मान्य केलं. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये पंतच्या जागी दिनेशला खेळवण्याचा निर्णय संघ समितीने घेतला होता. आज चालू असलेल्या भारत आणि हॉंगकॉंग सामन्यामध्ये पंतला स्थान मिळालं आहे. 


पंतने 31 कसोटी सामन्यांमध्ये 5 शतकांच्या मदतीने 2123 धावा केल्या आहेत, तर 27 वनडे सामन्यांमध्ये एका शतकाच्या मदतीने 840 धावा केल्या आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या 125 आहे. पंतने या फॉरमॅटमध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.