GT vs KKR: आयपीएलच्या 13 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) एकमेकांशी भिडले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरने अनपेक्षित विजय खेचून आणला. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) अनुपस्थितीत राशिद खानने (rashid khan) गुजरात टायटन्सची धुरा सांभाळली होती. यावेळी टॉस जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो KKR चा रिंकू सिंग (rinku singh).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 204 रन्स केले. 205 या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 5 सिक्स मारत सामन्याचे फासे उलटवले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने 3 विकेट्सने आपल्या टीमला विजयही मिळवून दिला. यानंतर रिंकूला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला. यावेळी रिंकू भावूक झालेला दिसला. 


रिंकूनच्या आज त्याच्या तुफानी फलंदाजीने हे दाखवून दिलं की, क्रिकेटमध्ये काहीही होणं शक्य आहे. खेळताना फक्त फलंदाजाचा स्वतःवर विश्वास असायला हवा. सामन्यानंतर रिंकू म्हणाला, मला विश्वास होता की मी टीमला विजय मिळवून देऊ शकतो.


नितीश सर्वांना म्हणाला होता, शेवटपर्यंत विश्वास ठेवा आणि फलंदाजी करा. बघूया आपण होतं ते. फलंदाजी करत असताना मी फक्त सिक्स मारण्याचा प्रयत्न करत होतो. दुसऱ्य एंडवरून उमेश यादव मला सांगत होता की, जास्त विचार करू नकोस आणि फक्त बॉल खेळ. मी जास्त विचार करत नव्हतो. कारण मला पूर्ण विश्वास होता. अखेर यश आमच्या पदरी पडलंच, अशा भावना रिंकूने व्यक्त केल्या. 


रिंकूची तुफान फलंदाजी


205 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना अखेरच्या ओव्हरला कोलकात्याला जिंकण्यासाठी 29 रन्स हवे होते. कोलाकाता पराभवाच्या छायेत होती. मात्र त्यावेळी कोलकात्याचा रिंकू सिंह स्टाईकवर होता. या ओव्हरमध्ये त्याने पाच सिक्स खेचले आणि सामना कोलकाताला जिंकवून दिला. सामन्यासोबत रिंकूने आजच्या सामन्यात चाहत्यांची मनंही जिंकून घेतली.