मुंबई: आयपीएलचे सामने आता प्लेऑफच्या दिशेनं जात आहेत. सामने अधिक चुरशीचे सुरू आहेत. दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ओव्हरदरम्यान अंपायरच्या निर्णयाचा पंतला राग आला. त्याने मैदाना सोडून खेळाडूंना बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


राजस्थान टीमने दिल्लीला 223 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली टीम एवढं मोठं लक्ष्य पूर्ण करू शकत नव्हती हे सामन्यात दिसत होतं. त्याचवेळी शेवटच्या ओव्हरमध्ये एक गडबड झाली. 


शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. ओबेद मॅक्कॉयने फेकलेल्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकले. पण तिसरा बॉल नो बॉल असल्याचं पंत म्हणाला. मात्र अंपायरने तो नो बॉल दिला नाही. 


अंपायरच्या निर्णयावर चिडलेल्या पंतने आपल्या टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून बाहेर येण्यासाठी सांगितलं. कोचने मध्यस्ती केल्यानंतर पुढे मॅच सुरू झाली. अंपायर नो बॉल चेक करू शकला असता मात्र त्याने तसं केलं नाही. मी खूप निराश आहे असं पंत म्हणाला. राजस्थानकडून दिल्लीचा 15 धावांनी पराभव झाला आहे.