Rishabh Pant Car Accident: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा आज सकाळी भीषण अपघात झाला. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारला (Rishabh Pant Car Accident) हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस ड्रायव्हर (Bus Driver saves rishabh pant life) सुशील कुमार यांनी पंतला पाहिलं. त्यांनी यावेळी पंतला सांभाळलं आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. यावेळी सुशील यांनी रक्तबंबाळ झालेल्या पंतची सर्व कहाणी सांगितली आहे.


कसा झाला अपघात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीवरून घरी परतत असताना पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच पंतची गाडी जळून खाक झाली. मुख्य म्हणजे ऋषभ पंत स्वतः गाडी चालवून त्याच्या घरी जात होता. यावेळी त्याला डुलकी लादली आणि गाडीचा अपघात झाला. 


बस ड्रायव्हरने वाचवला पंतचा जीव


सुशील कुमार या बस ड्रायव्हरने पंतचा जीव वाचवला. यावेळी एका वेबसाईटशी बोलताना सुशील कुमार यांनी सांगितलं की, "मी हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर असून हरिद्वारला जात होतो. यावेळी दिल्लीकडे जाणारी एक गाडी 60-70 च्या स्पिडने डिव्हायरला आदळली. ती गाडी आम्हाला टक्कर देणार असल्याचं लक्षात आल्यावर मी त्वरित गाडी फर्स्ट लाईनमध्ये काढली." 


अपघातादरम्यान त्याचा शरीरावर कपडे नव्हते


सुशील यांनी पुढे सांगितल की, ज्याचा अपघात झाला होता त्याला मी पाहिलं. तो जमिनीवर पडला होता, त्यावेळी मला वाटलं की, तो वाचणार नाही. मी त्याला उचललं आणि जळत्या गाडीपासून दूर नेलं. त्यावेळी गाडीत अजून कोणी आहे का, हे मी त्याला विचारलं, तेव्हा तो, म्हणाला की, मी एकटाच आहे. त्यावेळी त्याने, तो ऋषभ पंत असल्याचं सांगितलं. मला क्रिकेटबाबत इतकं माहिती नव्हतं. मी त्याला बाजूला उभं केलं, त्यावेळी त्याच्या शरीरावर कपडे नसल्याने मी त्याला गुंडाळण्यासाठी चादर दिली. 


त्यानेच आम्हाला सांगितलं की, तो ऋषभ पंत आहे. त्याचे पैसे देखील पडले असल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी आम्ही आसपास पडलेले 7-8 हजार रूपये एकत्र करून त्याला दिले. यावेळी माझ्या कंडक्टरने अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला. 15-20 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता आणि लंगडत चालत होता. आम्हाला त्यावेळी व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटलं, असंही सुशीलने सांगितलं.