Team India, T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यानंतर आता भारतीय संघ नेदरलँडशी (India vs Netherlands) भिडणार आहे. येत्या 27 ऑक्टोबरला सिडनीच्या (Sydney Cricket Ground) मैदानावर हा सामना होईल. त्यासाठी आता टीम इंडिया (Team India) सिडनीमध्ये पोहोचली आहे. नेदरलँड लिंबू टिंबू टीम असली तरी भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आता रोहितसेना नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 World Cup साठी टीम इंडिया नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) फुटबॉलवर पाय आजमावताना दिसत आहेत. विराट आणि पंतला फुटबॉलची आवड आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना दोघेही फुटबॉल खेळताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. 


आणखी वाचा - AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?


नेदरलँडविरुद्धच्या सामन्याआधी विराट आणि पंत मैदानात फुटबॉल (Virat Pant Football) घेऊन पोहोचले आणि वॉर्मअप सुरू केला. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. आपल्या अँकलची कमाल दाखवत दोघांनी मस्ती केली. त्यामुळे दोघांत कोण अव्वल?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.


पाहा व्हिडीओ - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, आयसीसीने त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. जणू काही दोघांमध्ये फुटबॉलची स्किल्स दाखवण्याची स्पर्धा रंगली आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट केल्यात. ज्यामध्ये कोण म्हणतंय, विराट भारी. तर कोणी पंतचं कौतूक केलंय. आता व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा, कोण अव्वल???