Rishabh Pant visits Delhi Capitals dressing room : मंगळवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो, दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant). अपघातानंतर पंत पहिल्यांदाचा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आला होता. पंत स्टेडियममध्ये आल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) च्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री करतोय. दिल्लीच्या टीमने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. 


ऋषभ पंतने स्टेडियममध्ये बसून गुजरात विरूद्ध दिल्ली असा सामना पाहिला. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. यावेळी त्याने टीमच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. केवळ दिल्ली कॅपिटल्सच नाही तर गुजरातचे खेळाडू देखील पंतला भेटायला आले होते. गुजरातचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही पंतची प्रकृतीची विचारपूस केली. हा व्हिडीओने चाहते मात्र भावूक झाले आहे.


अक्षर पटेलशी पंतने केली मस्ती


या व्हिडीओमध्ये मिचेल मार्श, रॉवमॅन पॉवेल हे परदेशी खेळाडू पंशी गळाभेट करतायत. 45 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कोच रिकी पोंटिंग पंतशी बराचकाळ चर्चा करत होते. यावेळी पंतवर झालेली शस्त्रक्रिया आणि रिकव्हरी याबाबत चर्चा झाली. यानंतर पंतने त्याचा मित्र आणि टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलची मान पकडली आणि मस्ती केली. 



जय शहा यांचीही पंतने घेतली भेट


गुजरात टायटन्सचा धडाकेबाज खेळाडू शुभमन गिलने पंतची भेट घेतली. गुजरात टायटन्सचा मुख्य कोच आशिष नेहरा आणि विजय शंकर यांनीही पंतची विचारपूस केलीये. याशिवाय सामना पाहताना तो बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह यांच्यासोबत बसला होता. बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही पंतची भेट घेतली.


डिसेंबरमध्ये पंतचा झाला होता अपघात


गेल्या वर्षी डिसेंबर सामन्यामध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अजून काही महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. सध्या तरी पंत 2023 च्या क्रिकेट विश्वचषकामध्येही खेळू शकणार नाहीये. यंदाच्या वर्षात तो क्रिकेटच्या मैदानात परतण्याची शक्यता फार कठीण आहे.