IPL 2023 : दिल्लीच्या पहिल्या सामन्यात सपोर्ट करायला स्टेडियममध्ये पोहोचला Rishabh Pant; फोटो व्हायरल
एका भीषण अपघातानंतर जवळपास 7-8 महिने पंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत टीमला पंतची खूप उणीव भासत होती. अशातच पंतला टीमसोबत अनुभवण्यासाठी दिल्लीच्या टीमने एक अनोखा मार्ग शोधला होता.
Rishabh Pant: आयपीएलचा (IPL 2023) थरार अखेर सुरु झाला आहे. आयपीएलचा तिसरा सामना खेळवला जात असून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) सामन्यातमध्ये नाहीये. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तो अजून पूर्णपणे रिकव्हर झालेला नाही. मात्र असं असूनही आजच्या सामन्यात त्याची उपस्थिती दिसून आली.
एका भीषण अपघातानंतर जवळपास 7-8 महिने पंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत टीमला पंतची खूप उणीव भासत होती. अशातच पंतला टीमसोबत अनुभवण्यासाठी दिल्लीच्या टीमने एक अनोखा मार्ग शोधला होता. दरम्यान हा मार्ग चाहत्यांनाही खूप भावला आहे.
दिल्लीला आली पंतची आठवण
1 एप्रिल रोजी लखनऊच्या क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची टीम ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरली होती. अशा परिस्थितीत टीमच्या पहिल्याच सामन्यात ऋषभलाची उपस्थितीचा अनुभव देण्यासाठी फ्रँचायझीने एक अनोखा मार्ग शोधला. स्टेडियमध्ये असलेल्या प्रेक्षकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला.
दिल्लीचा अनोखा मार्ग
दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने त्यांचा स्टार फलंदाज टी-शर्ट डगआउटमध्ये लटकवला आहे. यामध्ये पंतचा जर्सी क्रमांक-17 लिहिलेला दिसतोय. त्याचा टी-शर्ट डगआऊटच्या अगदी वर लावल्याचं दिसून येतंय. दिल्ली कॅपिटल्सच्या अनोख्या कल्पनेचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर झाला होता. या नंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यान यामधून अजून पंत पूर्णपणे रिकव्हर न झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानापासून अजून बराच काळ दूर राहणार आहे.