IPL 2023 : ऋषभ पंत संदर्भातली सर्वात मोठी अपडेट,आता आयपीएलमधून झाला बाहेर
Rishabh Pant Ruled Out IPL 2023 : दिल्लीत अपघात झाल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. सध्या तो मुंबईत असून त्याच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलीय.
Rishabh Pant Ruled Out From IPL 2023 : टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Delhi Capital Captain Rishabh Pant) आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सामन्यात तो खेळताना दिसणार नाही आहे.यामुळे क्रिकटे फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
मुंबईत उपचार सूरू
दिल्लीत अपघात झाल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. सध्या तो मुंबईत असून त्याच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलीय. दरम्यान पंतला तंदुरुस्त होण्यासाठी अजून किमान 6 महिने लागणार आहेत. त्यामुळे तो आयपीएलला मुकणार आहे. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला असल्याचे सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) म्हटले आहे.
सौरव गांगुली काय म्हणाला?
मी दिल्ली कॅपिटल्सच्या (Dehi Capitals) संपर्कात आहे. ही एक उत्तम आयपीएल असेल. आम्ही चांगले करू असा विश्वास दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना वक्त केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ऋषभ पंत आयपीएल 2023 साठी उपलब्ध होणार नाही. ऋषभ पंतच्या दुखापतीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्स संघावर होणार नाही. दरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सौरव गांगुलीने दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
आयपीएलमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल (Dehi Capitals) संघाचे नेतृत्व करतो. मात्र या अपघातामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. आता दिल्लीची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर पडते हे पाहावे लागणार आहे.
कॅप्टन्सीसाठी 'हे' दावेदार
दिल्ली कॅपिटल्स (Dehi Capitals) संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे कर्णधार पदासाठी दावेदार ठरू शकतात. यामध्ये दोन नावे समोर येत आहेत, ती म्हणजे डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे, आतंरराष्ट्रीय सामन्यांसोबतच त्यानं आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघानं आयपीएलचा खिताबही जिंकलाय. या कारणामुळे तो कर्णधार पदासाठी तो प्रमुख दावेदार मानला जातोय. तर दुसरीकडे पृथ्वी शॉही प्रतिभावान खेळाडू आहे, त्याच्या नेतृत्वाखाली अंडर 19 संघाने वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. त्यामुळे हे दोन खेळाडू प्रमुख दावेदार आहेत.
दरम्यान आता या दोन खेळाडूंमधून कोणत्या खेळाडूच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडते, हे पाहावे लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा (Dehi Capitals) संघ: ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.