Rishabh Pant Health Update : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत  (Rishabh Pant) मोठ्या जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. मात्र अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातातून बचावल्यानंतर त्याच्यावर विविध रूग्णालयात उपचार सूरू होते. या उपचारानंतर आता प्रथमच ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्याने बीसीसीआय (BCCI)आणि जय शाह यांचे आभार मानले आहे. या त्याच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  


हे ही वाचा : BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया मांडली आहे. या प्रतिक्रियेत त्याने बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानले आहे. नेमका तो ट्विटमध्ये काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात.


ट्विटमध्ये काय म्हणाला?


'मी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे.माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. माझी तबियत दिवसेंदिवस सुधारते आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे.बीसीसीआयचे आणि जय शाह यांचे आभार,असे ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या ट्विटमध्ये म्हणतोय.


नेमकी घटना काय?


ऋषभ पंत (Rishabh Pant) 30 डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. या दरम्यान त्याची कार दुभाजकाला धडकली होती. या अपघातात त्याच्या कारला आग लागली होती. यावेळी हरियाणा रोडवेजच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पंतला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले होते. पंत कारमधून बाहेर पडताच ती पूर्णपणे पेटली होती. त्याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण नाही. बीसीसीआय पंतच्या सतत संपर्कात असून त्यावर लक्ष ठेवून आहे. 



 ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या मुंबईत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. त्याच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्याच्या तबियतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आता किमान 6-7 महिने मैदानापासून दूर राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र सध्या संपुर्ण देश पंत लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे.