Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून रिषभ थोडक्यात बचावला आहे. रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंतच्या शुक्रवारी काही (Rishabh Pant Health Update) वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता रिषभ अपघात झाला तरी कसा?, याबाबत स्वत: रिषभने मोठा खुलासा केलाय. (Rishabh revealed about car accident to DDCA director says its happened due to a pothole on the highway marathi news)


नेमका अपघात कशामुळे झाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA director) संचालक श्याम शर्मा (Shyam Sharma) पंतला भेटण्यासाठी डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) पोहोचले, तेथं त्यांनी पंतशी चर्चा केली आणि यादरम्यान पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.


काय म्हणाला रिषभ पंत?


श्याम शर्मा (Shyam Sharma) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंतने सांगितले की त्याचा अपघात डुलकीमुळे झाला नाही तर खड्ड्यामुळे झाला. रात्रीची वेळ होती. त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. एक खड्डा होता, तो वाचवण्यासाठी गेल्यावर अपघात झाला, असं रिषभने (Rishabh revealed about accident) सांगितलं.


आणखी वाचा - Rishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान


दरम्यान, पंतच्या आतापर्यंत आलेल्या डॉक्टरांच्या अहवालानुसार पंतला गंभीर दुखापत झालेली नाही. पंत 2 महिन्यांत मैदानावर येईल, अशी आशा DDCA चे सयुंक्त सचिव राजन मनचंदा (Secretary Rajan Manchanda) यांनी व्यक्त केली आहे. पंत लिगमेंटच्या ट्रिटमेंटसाठी लंडनला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयचे (BCCI) डॉक्टर्स त्यावर नजर ठेऊन आहेत.