Ritika Sajdeh Reaction : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border Gavaskar Trophy ) 22 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टेस्ट सामने खेळले जाणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील. असं म्हंटल जातंय की रोहितची पत्नी रितिका ही गरोदर असून तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अशात रोहित आपल्या कुटुंबाला वेळ देऊ इच्छितो. यावर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम मॅनेजमेंटकडे मागणी केली होती की रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार म्हणून नेमले जाऊ नये यावर आता रितिका सजदेह (Ritika Sajdeh)  हिची रिऍक्शन व्हायरल झाली आहे. 


सुनील गावस्कर काय म्हणाले होते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं आम्ही वाचत आहोत. कदाचित तो दुसरा कसोटी सामनाही खेळणार नाही. जर असं असेल तर मी आताच सांगतोय की, भारतीय निवड समितीने त्याला सांगावं, 'जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. जर वैयक्तिक कारणं असतील तर त्यात लक्ष घाल. पण जर तू दोन-तीन सामने गमावणार असशील तर मग या दौऱ्यात फक्त एक खेळाडू म्हणून जा. आम्ही तुला या दौऱ्यात उप-कर्णधार करु'", असं सुनील गावसकर 'स्पोर्ट्स तक'शी संवाद साधताना सांगितलं.


हेही वाचा :   गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये


 


ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने घेतली होती रोहितची बाजू : 


सुनील गावस्कर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एरोन फिंचने रोहित शर्माची बाजू घेतली होती. फिंचने म्हंटले होते की, 'जर रोहित शर्मा आपल्या मुलाच्या जन्मासाठी संघा सोबत उपलब्ध नसेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, मी सनीशी (सुनील गावस्कर) असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या पत्नीला मुलं होणार आहे म्हणून जर त्याला घरी राहायचे असेल तर हा खूप सुंदर क्षण आहे. याबाबतीत तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तितका वेळ घेऊ शकता. एरोन फिंचने दिलेल्या स्टेटमेंटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावर रोहितची पत्नी रितिका हिने कमेंट करत सेल्युट ठोकणारा ईमोजी टाकून एरोन फिंच एक टॅग केलं आहे. 



बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 


पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी