Ritika Sajdeh : रोहित शर्मा शून्यावर बाद होताच पत्नी रितीकाला हसू अनावर? फोटो होतोय व्हायरल
Ritika Sajdeh : 200 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ( Team India ) फलंदाज रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित भोपळाही फोडू शकला नाही. दरम्यान यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) स्टँडमध्ये बसून हसत असल्याचं दिसून आलं.
Ritika Sajdeh : वर्ल्डकप स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा ( Team India ) पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फेल गेलेले ठरले. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , ईशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले. 200 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ( Team India ) फलंदाज रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित भोपळाही फोडू शकला नाही. दरम्यान यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) स्टँडमध्ये बसून हसत असल्याचं दिसून आलं.
पतीची विकेट गेल्यावर रितीका खूश?
ICC वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये पाचवा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह सामना पाहण्यासाठी आली होती. टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाल्यावर ईशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीला उतरले. यावेळी भारताची पहिली विकेट गेल्यानंतर रोहित ( Rohit Sharma ) शून्यावर एलबीडबल्यू आऊट झाला. रोहितची विकेट गेल्यानंतर कॅमेरा स्टँडमध्ये बसलेल्या रितीकाकडे नेण्यात आला. त्यावेळी रितीका ( Ritika Sajdeh ) हसत असल्याचं दिसून आलं. रितीकाचं हसणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.
टीम इंडियाचा डाव सुरु असताना दुसरी ओव्हर उजव्या हाताच्या वेगवान जोश हेझलवूडने टाकली. या ओव्हरमधील तिसरा बॉल रोहित चुकीच्या लाईनवर खेळायला गेला आणि बॉल त्याच्या पॅडला लागला. यावेळी अंपायरने LBW आऊट दिला. मैदानावरील अंपायरच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन रोहितने डीआरएस घेतला पण थर्ड अंपायरनेही रोहितला ( Rohit Sharma ) आऊट दिलं. त्यामुळे रोहित शर्माला शून्यावर माधारी परतावं लागलं.
रोहितची विकेट गेल्यानंतर कॅमेरामॅनने रोहितची ( Rohit Sharma ) पत्नी रितीकावर फोकस केला. त्यावेळी रितीका हसताना कॅमेरात कैद झाली. दरम्यान रितीकाचं हे वागणं चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.
टीम इंडियाचा कांगारूंवर विजय
टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 200 रन्सचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 41.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. केएल राहुलने अखेरीस सिक्स लगावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यावेळी 1992 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पराभव झालाय.