International League T20 Dubai: महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 साली टी-ट्वेंटी वर्ल्ड कप उचलला. युवराज सिंह (Yuvraj Singh), सचिन तेंडूलकर, हरभजन सिंह यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी भारताला विश्वविजेता (World Cup) बनवलं. या टीममधील जवळजवळ सर्व खेळाडूंनी निवृत्ती (Retirement) घेतली आहे. टीम इंडियाच्या एका स्फोटक फलंदाजाने यापूर्वी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर काही महिन्यांनीच हा खेळाडू मैदानात परतला आहे. (robin uthappa brilliant innings dubai capitals vs gulf giants international league t20 marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत आहे. या खेळाडूने मैदानावर दमदार पुनरागमन करताना झंझावाती खेळी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. या खेळाडूचं नाव रॉबिन उथप्पा...  रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 14 सप्टेंबर 2022 रोजीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय लीग T20 (ILT20 2023) मध्ये खेळत आहे. रॉबिन उथप्पाने या लीगमध्ये दुबई कॅपिटल्सकडून (Dubai Capitals) खेळताना स्फोटक खेळी केली आहे.


गल्फ जायंट्सविरुद्ध (Gulf Giants) खेळल्या जात असलेल्या सामन्यात सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) धमाकेदार खेळी केली. उथप्पाने  46 बॉलमध्ये 171 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या. यादरम्यान रॉबिन उथप्पाच्या बॅटमधून 10 चौकार मारले. तर उथप्पाने 2 गगनचुंबी षटकार खेचले. रॉबिन उथप्पा व्यतिरिक्त युसूफ पठाण (Yusuf Pathan) देखील याच टीमकडून खेळतोय.


आणखी वाचा - Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले, 'हा' खेळाडू मोडेल सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड


दरम्यान, उथप्पाने (Robin Uthappa) भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 6 अर्धशतकांच्या बळावर एकदिवसीय सामन्यात 934 धावा केल्या. तर T20 मध्ये त्याने 1 अर्धशतकासह 249 धावा केल्या होत्या. आता त्याने निवृत्ती घेतलीये. पण त्याच्या फलंदाजीची धार अद्याप कमी झालेली दिसत नाही.