नागपूर : टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. त्याच्या घरातून मोबाईल फोन आणि 45000 रुपये चोरीला गेले आहे. उमेश यादवच्या नागपूर येथील घरात ही चोरी झाली आहे. उमेश यादवने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी उमेश यादवने नागपूरमध्ये आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या पदाचा कार्यभार सांभाळला. नोकरीसाठी काही दिवसांपासून उमेश यादव नागपूरमध्ये राहत आहे. याच दरम्यान त्याच्या घरात चोरी झाली.


उमेश यादव घरी नव्हता तेव्हा ही चोरी झाली. सोमवार संध्याकाळी उमेश यादव जेव्हा घरी आली तेव्हा त्याला त्याच्या घराचा टाळा टुटलेला दिसला. जेव्हा त्याने घरातील वस्तू पाहिल्या. तर ४५००० आणि एक आयफोन चोरीला गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.