मेलबर्न : वय वर्षे चक्क ३६. पण, कोर्टवरचा उत्साह असा दांडगा की, विशीतल्या युवकालाही वाटेल आश्चर्य. आतापर्यंतच्या कारकीर्दीत तब्बल २० ग्रॅडस्लॅम नावावर. इतकी प्रचंड कामगिरी असूनही अद्यापही विजयाची भूक कायम. हे सर्व वर्णन आहे टेनिस कोर्टवर अनभिषिक्त सम्राट ठरलेल्या रॉजर फेडररचे.


फटकेबाजीचा गुण त्याच्या उपजतच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉजरने नुकताच सहावा ऑस्ट्रेलियाई ओपन आणि त्याच्या एकूण कारकीर्दीतला २०वा ग्रॅंडस्लॅम चषक जिंकला. इतकी मोठी कामगिरी केल्यावर त्याला तुझ्या विजयाचे श्रेय कोणाला देशील?, असा सवाल विचारला गेला नाही तरच नवल. प्रश्न तसा नाजूक, अनेकांना आनंद देणारा तर, अनेकांना काहीसा नाराज करणारा. पण, खेळाडूच तो. फटकेबाजीचा गुण त्याच्या उपजतच. त्याने या प्रश्नाला मनमोकळेपणे उत्तर दिले.


मिर्काने रॉजररला दिली संघर्षात साथ


रॉजरने आपल्या विजयाचे आणि आतापर्यंतच्या संपूर्ण कारकीर्दीचे श्रेय आपली पत्नी मिर्का हिला दिले आहे. त्याने सांगितले की, माझ्या यशाची शिल्पकार ही मिर्का हिच आहे. आतापर्यंत मर्काने माझ्या प्रत्येक संघर्षात मोलाची साथ दिली आहे. मी खेळत असताना अनेकदा ती तुम्हाला टेनिस कोर्टाच्या बाहेर बसून राहिलेली तुम्हाला पहायला मिळेल. खरे तर, चार मुलांची तिच्यावर जबाबदारी आहे. पण, तरीही ती जबाबदारी ती एकटी पार पाडतेच. पण, मलाही प्रेरणा देते.


खरेतर मी खेळ आणि सरावात नेहमी व्यग्र असतो. अशा वेळी ती मुलांना माझी गरज भासू देत नाही. ती आणि माझी मुले नेहमीच माझ्या खेळाचा आनंद घेतात. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय माझ्या पत्नीला जाते, असेही फेडरर सांगतो.