पाकिस्तान विरुद्ध रोहित-शिखरने मोडले अनेक रेकॉर्ड
रोहित शर्मा आणि शिखर धवनची तुफानी खेळी
दुबई : आशिया कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयासोबतच या सामन्यात अनेक नवे रेकॉर्ड बनले.
रोहित-धवनची शतकीय खेळी
भारताकडून रोहित शर्माने 111 आणि शिखर धवनने 114 रनची तुफानी खेळी केली. असं फक्त दुसऱ्यांदा झालं आहे की भारताच्या 2 ओपनर बॅट्समनने धावांचा पाठलाग करताना शतक ठोकले आहे. याआधी 2002 च्या चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये इंग्लंड विरुद्ध वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांनी हा कारनामा केला होता.
210 रनची पार्टनरशिप
रोहित शर्मा आणि शिखर धवनने 210 रनची पार्टनरशिप केली. पहिल्यांदाच भारताच्या ओपनर बॅट्समनने धावांचा पाठलाग करतांना इतकी मोठी पार्टनरशिप केली आहे. याआधी रिकॉर्ड वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 2009 मध्ये न्यूझीलंड विरोधात 201 रनची पार्टनरशिप केली होती.
पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठी ओपनिंग
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 210 रनची पार्टनरशिप करत अनेक रेकॉर्ड मोडले. पाकिस्तान विरोधात भारताकडून ही सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप होती. याआधी सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरने 159 रनची पार्टनरशिप केली होती. सौरव-सचिनने 1998 मध्ये ढाका येथे पाकिस्तान विरुद्ध ही मोठी पार्टनरशिप केली होती.
ओपनिंगला 13वी शतकीय पार्टनरशिप
रोहित शर्मा आणि शिखर धवनने 13 व्या वेळा ओपनिंग करत शतकीय पार्टनरशिप केली आहे. आता रोहित-धवन ओपनर म्हणून सर्वाधिक शतकीय पार्टनरशिप करणारी दुसरी जोडी बनली आहे. सर्वात अधिक शतकीय पार्टनरशिप सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या ओपनिंग जोडीने केली आहे. सौरव-सचिनने 21 वेळा 100 हून अधिक वेळा ही पार्टनरशिप केली आहे आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
एकाच दिवसात सर्वात मोठा आणि लहान विजय
भारताने पाकिस्तानला 9 विकेटने पराभूत केलं. भारताने हे पहिल्यांदा केलं आहे. याआधी पाकिस्तानवर भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांग्लादेशने अफगानिस्तानला फक्त 3 रनने पराभूत केलं होतं. हा बांग्लादेशचा अफगानिस्तानवर सर्वात कमी रनच्या अंतराने मिळवलेला विजयाचा रेकॉर्ड आहे. आशिया कपमध्ये रविवारी झालेल्या 2 सामन्यात एक सर्वात मोठा आणि एक सर्वात लहान विजय पाहायला मिळाला. याआधी 2002 मध्ये आशिया कपमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशला 2 रनने पराभूत केलं होतं.