दुबई : आयपीएल 2021 पुन्हा एकदा युएई मध्ये सुरू झाली आहे. यंदा आयपीएल भारतात एप्रिल महिन्यातच सुरू झाली होती. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा मे महिन्यातच थांबवण्यात आली. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना पहिला खेळवला गेला. मात्र या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर उतरला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सीएसके विरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत ऑलराऊंडर हार्दिक पंड्या देखील मैदानावर दिसला नाही. तर आता या दोघांच्याही फीटनेसचे अपडेट समोर आले आहेत. 


रोहित-हार्दिकचे फीटनेस अपडेट


मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या गुरुवारी संघाच्या आयपीएल सामन्यात खेळणार याबद्दल निश्चित नाहीये. तो म्हणाला की, या दोघांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. गुडघेदुखी आणि किरकोळ दुखापतीमुळे रोहित चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळू शकला नाही म्हणून किरोन पोलार्डने संघाचे नेतृत्व केलं होतं.


कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी बोल्ट म्हणाला, "त्या दोघांचीही परिस्थिती उत्तम आहे. त्याच्या पुढच्या सामन्यात खेळण्याचा प्रश्न आहे, मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही. साहजिकच हे दोघेही मुंबईसाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि आम्ही त्यांच्या संघात लवकरात लवकर परतण्याची अपेक्षा करतो."


चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितची उणीव जाणवली. तो म्हणाला, "या फॉरमॅटमध्ये रोहितचा अनुभव आणि कामगिरी पाहता, त्याची उणीव भासली. पुढे बरंच क्रिकेट खेळायचं असून त्याची १०० टक्के फिटनेस सुनिश्चित करणं हा योग्य निर्णय होता.