मुंबई : T-20 वर्ल्डकप 2021 नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा नवा कोच राहुल द्रविड आणि नवा T20 कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही नव्याने सुरुवात करणार आहे. यामुळे टीम मागील कामगिरी विसरून अधिक चांगली कामगिरी करण्यावर भर देईल. न्यूझीलंड संघाविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका हे दोघांसाठी पहिलं आव्हान असेल. दरम्यान या मालिकेपूर्वी रोहित आणि द्रविडने मोठी रणनीती तयार केली आहे.


रोहित-द्रविडने बनवली नवी योजना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यादरम्यान भारताचा टी-20 कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'संघाला या टी-20 फॉरमॅटशी जुळवून घेण्याची गरज आहे. इतर कोणत्याही संघाची रणनीती पाहण्याऐवजी भारताला स्वतःचं नियोजन करावं लागेल."


या फॉरमॅटमध्ये भारताला चांगलं बनवण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. भारताने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण आम्ही आयसीसी टी-20 स्पर्धा जिंकू शकलो नाही. आम्ही एक टीम म्हणून चांगला खेळलो आणि चांगली कामगिरी केली. संघातील काही उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही रोहित शर्मा म्हणालाय.


'एक चांगली टीम तयार करायचीये'


रोहित पुढे म्हणाला, "मी असे म्हणत नाही की आपण काही नियमांचं पालन केलं पाहिजे. आम्हाला फक्त एक चांगली टीम तयार करायची आहे, जी आमच्यासाठी चांगली असेल." 


टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं मत आहे की, न्यूझीलंडला हलक्यात घेतलं जाऊ शकत नाही. न्यूझीलंड खूप चांगला संघ आहे. यात शंका नाही. त्यांनी आम्हाला मोठ्या सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे."