मुंबई : वेस्टइंडीज दौऱ्याला जाण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने, रोहित शर्मासोबत कोणतीही नाराजी किंवा वाद असल्याची बाब फेटाळून लावली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी या आधीच म्हटलं आहे, 'खेळाडू टीमपेक्षा मोठा असू शकत नाही.' दरम्यान, वादग्रस्त बातम्यांनंतर पहिल्यांदा रोहित शर्माने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. आता रोहित शर्माने आपलं मनातलं इन्स्टाग्रामवर मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमचा उपकर्णधार रोहित शर्माने इन्स्ट्राग्राम एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्याखाली लिहिलं आहे, मी फक्त आपल्या टीमसाठी नाही आपल्या देशासाठी खेळतो. 


दौऱ्यावर रवाना होण्याआधी रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं, 'टीम ज्या प्रमाणे खेळत आहे, यात कोणताही खेळाडू टीमपेक्षा मोठा नाही. ज्या प्रमाणे खेळाडू खेळतात, ते टीमच्या हितासाठी खेळतात, जर वाद राहिले असते, तर टीमच्या खेळात सातत्य राहिलं नसतं'.


विराट कोहलीने म्हटलं होतं, 'मी इमानदारीने सांगितलं तर हे खूपच वाईट आहे, अशा बातम्या वाचणं निराशाजनक वाटतं, आम्हाला बातम्यांमधून खोटं वाढलं जातं आहे. आपण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहोत. आपण आपल्या मनात काहीतरी ठरवतो आणि आपल्याला असं वाटतं की हे सर्वांनी सत्य समजून पचवावं'.


विराट आणखी पुढे म्हणतो, 'जर मला कुणी आवडत नाही, तर हे माझ्या वागण्याबोलण्यावरून सहज लक्षात येतं. जर टीममध्ये गोष्टी योग्य नसल्या असत्या तर आपण चांगला खेळ करू शकलो नसतो.'