हिटमॅन रोहित शर्मा `या` गोलंदाजासमोर टाकतो नांगी...
दुसऱ्या टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने सिरीजही आपल्या नावे केली आहे. मात्र या सामन्यात कर्णधार रोहितची बॅट काही चांगला खेळ करू शकली नाही.
मुंबई : कर्णधार रोहित शर्माची कर्णधार म्हणून कारकिर्द चांगलीच गाजतेय. रोहित शर्मा जेव्हापासून टीम इंडियाचा कर्णधार झाला आहे. तेव्हापासून टीम इंडियाला अच्छे दिन आल्याचं दिसतंय. श्रीलंकेविरूद्ध काल दुसरा टी -20 सामना झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने सिरीजही आपल्या नावे केली आहे. मात्र या सामन्यात कर्णधार रोहितची बॅट काही चांगला खेळ करू शकली नाही.
काल फलंदाजी करताना टीम इंडियाला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. कालच्या सामन्यात रोहित केवळ एक रन करून माघारी परतला. दुष्मंता चमीराने त्याला क्लिन बोल्ड करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला.
रोहित शर्माच्या टी-20 करियरमध्ये पाचव्यांदा असं झालं आहे, जेव्हा चमीराने त्याची विकेट काढली आहे. रोहितच्या टी-20 करियरमध्ये चमिरा एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने रोहितला सर्वात जास्त वेळा बाद केलं आहे.
रोहित शर्मा सर्वाधिक वेळा कोणाच्या विरुद्ध आऊट झाला
दुष्मंता चमीरा- 5 वेळा (श्रीलंका)
टिम साउदी- 4 वेळा (न्यूझीलंड)
ईश सोढी- 3 वेळा (न्यूझीलंड)
दरम्यान गेल्या सामन्यात रोहितने त्याच्या नावे एक स्पेशल रेकॉर्ड केला आहे. रोहित आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा फलंदाज ठरलाय. तसंच रोहित शर्मा T20I क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.